जातिभेद व अस्पृश्यता हे दोन मोठे शाप आपल्या देशाला मिळालेले आहेत. त्याचे समूळ निराकरण करण्याकरिता संत, विचारवंत, समाजसुधारक यांनी आपले जीवन समर्पित केले. असे हे बहुपेडी, बहुआयामी व्यक्तिमत्त्व. त्यांच्या कार्याची दखल, आठवण व नोंद, कायमस्वरुपी राहावी म्हणून हा चरित्रकथनाचा प्रपंच.
अस्पृश्यता निवारणासाठी समतानंद अनंत हरी गद्रे यांनी केलेली झुणका-भाकर चळवळ महाराष्ट्रभर गाजली. ज्येष्ठ लेखक-संपादक भानू काळे यांनी लिहिलेले त्यांचे चरित्र याच वर्षी प्रसिद्ध झाले आहे. आता ते चरित्र श्राव्य स्वरूपातही (ऑडिओ बुक) प्रसिद्ध झाले आहे. ज्येष्ठ अभिनेते आणि प्रतिभावंत लेखक दिलीप प्रभावळकर यांच्या आवाजात हे चरित्र ऐकता येणार आहे. रविराज पब्लिसिटीने या ऑडिओ बुकची निर्मिती केली असून, ते बुकगंगा डॉट कॉमवरून ते नुकतेच प्रकाशित करण्यात आले आहे.
या ऑडिओ बुकविषयी अधिक वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा. https://www.bytesofindia.com/P/NVVICS