Episode 5 ------------------ Reverb Katta प्रस्तुत, स्वा. सावरकर समग्र जीवनदर्शन घडविणारे एक रोमहर्षक ध्वनिनाट्य
"अनादि मी, अनंत मी"
भाग पाचवा वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी विनायकराव अर्थात तात्याराव सावरकरांनी भारतमातेचे गुणगान करणारी एक अजरामर कविता रचली जी प्रत्येक भारतीयाला राष्ट्रभक्तीचे स्फुरण देते -"जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे"
ब्रिटिशांनी बंदी घातलेल्या, '1857 चे स्वातंत्र्यसमर' ह्या सावरकरांच्या ऐतिहासिक ग्रंथाचे वितरण भारतात गुप्तपणे केल्याबद्दल, थोरले बंधू बाबाराव सावरकरांची रवानगी, ब्रिटिशांनी काळ्या पाण्याच्या बंदिवासासाठी अंदमानात केली. तात्याराव सावरकरांनी लंडनहून सौ. येसूवहिनीला सांत्वनपर लिहिलेले ह्रिदयद्रावक पत्र आणि नंतर सावरकरांनी रचलेल्या अजरामर कविता, पूर्ण सावरकर कुटुंबियांच्या देशाप्रती अखंड बलिदान देण्याच्या अद्भुत मनस्थितीचे वर्णन करतात.
Now Streaming on: अनादि मी अनंत मी ऑडियो ऍप्स BookGanga Audio Reader(Android and iOS)
लेखक/दिग्दर्शक: माधव खाडिलकर संगीत: आशा खाडिलकर निर्मिती: ओंकार खाडिलकर सहनिर्माते: Reverb Productions संगीत संयोजन: आदित्य ओक ध्वनी संयोजन: मंदार कमलापूरकर डिजिटल पार्टनर: स्मृतिगंध सौजन्य: उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट