Summary of the Book
Reverb Katta प्रस्तुत,
स्वा. सावरकर समग्र जीवनदर्शन घडविणारे एक रोमहर्षक ध्वनिनाट्य
"अनादि मी, अनंत मी"
*भाग आठवा*
अंदमानातील नरकयातना शब्दातीत होत्या. एखाद्या बैलासारखे ,भारतीय कैद्यांना घाण्याला जुंपून, कोलुला लावून तेल काढण्याचे, नारळ सोलून काथ्याकूट काढण्याचे, दिवसभर दंडाबेदी घातलेल्या अवस्थेत , हात वर बांधून काठ्या आणि चाबकाचे फटके मारून, अर्ध्याकच्च्या जेवणात नको नको ते कृमीकीटक घालून सावरकरांसहित सर्व कैद्यांचे मानसिक आणि शारीरिक खच्चीकरण करण्याचे अनेक प्रयत्न सतत करण्यात आले. मात्र, ह्या सर्व हालअपेष्टा सोसत असतानाही, सावरकरांनी हिंदी, बंगालीबरोबरच ऊर्दू भाषेवर प्रभुत्व संपादन केले आणि त्यांच्यातील महाकवीचे स्फुल्लिंग तिथेही तेजाळले. सप्तर्षी, गोमांतक, कमला ह्यासारखी शृंगाररसपूर्ण महाकाव्ये असोत वा, देशभक्तीच्या गज़ल असोत, सावरकरांनी ही सर्व शब्दसंपदा तुरुंगाच्या भिंतींवर खिळे/काटे ह्या वस्तूंच्या साहाय्याने रेखाटली आणि पूर्ण तोंडपाठ करून ठेवली. बरोबरच्या कैद्यांना एकत्र करून , त्यांचे मनोधैर्य वाढवून्, गुप्तपणे निरोप देता यावेत ह्यासाठी सावरकरांनी एक सांकेतिक ध्वनीलिपी वापरात आणली. अशी दहा खडतर वर्षे लोटल्यानंतर, 2 मे 1921 साली राजबंदयांच्या मुक्तता धोरणानुसार सावरकरांची अंदमानातून सुटका झाली मात्र पुढील 3 वर्षे पुण्याला येरवडा कारागृहात आणि पुढे 1937 सालापर्यंत रत्नागिरीमध्ये स्थानबद्द राहण्याच्या बंधनावर त्यांची रवानगी करण्यात आली.
Now Streaming on:
*ऑडियो ऍप्स*
BookGanga Audio-Reader(Android and iOS)
लेखक/दिग्दर्शक: माधव खाडिलकर
संगीत: आशा खाडिलकर
निर्मिती: ओंकार खाडिलकर
सहनिर्माते: Reverb Productions
संगीत संयोजन: आदित्य ओक
ध्वनी संयोजन: मंदार कमलापूरकर
डिजिटल पार्टनर: स्मृतिगंध
सौजन्य: उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट