स्वा. सावरकर समग्र जीवनदर्शन घडविणारे एक रोमहर्षक ध्वनिनाट्य
"अनादि मी, अनंत मी"
भाग चवथा वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी विनायकराव अर्थात तात्याराव सावरकरांनी भारतमातेचे गुणगान करणारी एक अजरामर कविता रचली जी प्रत्येक भारतीयाला राष्ट्रभक्तीचे स्फुरण देते -"जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे"
सन 1905 साली बी.ए. ची पदवी मिळवल्यावर, सावरकरांनी इंग्लंडमध्ये जाऊन बॅरिस्टरची पदवी मिळवावी आणि त्याचा वापर ब्रिटिश राजवटीविरुद्ध करावा ह्यासाठी लोकमान्य टिळकांनी देशभक्त श्यामजी कृष्णवर्मा ह्यांच्याकडे शिफारस केली. त्यानुसार लंडनसाठी वाफेच्या बोटीद्वारे प्रयाण होताच, कुशल नेतृत्व आणि संघटनकौशल्य अंगी बाणविलेल्या सावरकरांनी ,अनेक भारतीय युवा विद्यार्थ्यांना क्रांतिकार्याचे धडे दिले आणि त्यांचा विश्वास संपादन केला. लंडनमध्ये 65, क्रोमवेल अव्हेन्यू, हायगेट येथे India House अर्थात भारत भवन ह्या वास्तूमध्ये , सावरकरांनी बॅरिस्टरीच्या अभ्यासाबरोबरीने, 'अभिनव भारत' संस्थेचे कार्य छुप्या पद्धतीने सुरू केले. तिथंच लिहिलेल्या ऐतिहासिक '1857 चे स्वातंत्र्यसमर' ह्या ग्रंथाचे लेखन सावरकरांनी, ब्रिटिशांच्या नाकावर टिच्चून बाबाराव सावरकरांच्या मदतीने भारतात प्रसिद्ध केले. अवघ्या 20 वर्षांच्या क्रांतिकारक तरुण मदनलाल धिंग्रानी, कर्झन वायलीची हत्या लंडनमध्ये केल्यानंतर त्यांना फाशी शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर ,त्यांची साक्ष सावरकरांनी अमेरिकेत प्रसिद्ध करविली आणि ब्रिटिशांच्या क्रूर कारवायांकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले.
Now Streaming on: ऑडियो ऍप्स BookGanga Audio Reader(Android and iOS)
लेखक/दिग्दर्शक: माधव खाडिलकर संगीत: आशा खाडिलकर निर्मिती: ओंकार खाडिलकर सहनिर्माते: Reverb Productions संगीत संयोजन: आदित्य ओक ध्वनी संयोजन: मंदार कमलापूरकर डिजिटल पार्टनर: स्मृतिगंध सौजन्य: उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट