Reverb Katta प्रस्तुत, स्वा. सावरकर समग्र जीवनदर्शन घडविणारे एक रोमहर्षक ध्वनिनाट्य
"अनादि मी, अनंत मी"
भाग दुसरा आता उपलब्ध लहानग्या विनायकाने प्रचंड वाचन, लेखन आणि चिंतन करून भारतीय पौराणिक कथा, इतिहासातील मुख्य घटना आणि देशभक्तीपर अनेक कविता आत्मसात केल्या . लावणी, लोकगीते आणि शाहिरी पोवाडे लिहीणाऱ्या कवी गोविंदांची प्रतिभा ओळखून, त्यांना राष्ट्रभक्तीपर पोवाडे, कवने लिहिण्यास विनायकाने प्रवृत्त केले. 1897 साली ,प्लेगच्या साथीने महाराष्ट्रात थैमान घातले .मात्र ब्रिटिशांनी ह्याचा फायदा घेऊन जागोजागी घरांवर धाडी टाकून सर्वसामान्यांवर अत्याचार केले. पुण्यात चापेकर बंधूंनी कर्नल रँडच्या ह्या कृत्याचा बदला त्याची हत्या करून मिळवला आणि बदल्यात फासावर गेले. हे पाहून प्रगल्भ बुद्धीच्या विनायकाच्या मनात ब्रिटिश सरकारविरुद्ध प्रचंड राग उफाळला. आपले संपूर्ण आयुष्य देशाच्या स्वातंत्र्यासाठी , सशस्त्र क्रांतीचे मार्ग वापरून, झोकून देण्याचा प्रण विनायकाने आपल्या सहविचारी मित्रांसमवेत केला आणि तो जोपासला आयुष्याच्या अखेरीपर्यंत .
Now Streaming on: ऑडियो ऍप्स BookGanga Audio Reader(Android and iOS)
लेखक/दिग्दर्शक: माधव खाडिलकर संगीत: आशा खाडिलकर निर्मिती: ओंकार खाडिलकर सहनिर्माते: रिव्हर्ब प्रोडक्शन्स संगीत संयोजन: आदित्य ओक ध्वनी संयोजन: मंदार कमलापूरकर डिजिटल पार्टनर: स्मृतिगंध सौजन्य: उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट