Reverb Katta प्रस्तुत, स्वा. सावरकर समग्र जीवनदर्शन घडविणारे एक रोमहर्षक ध्वनिनाट्य
"अनादि मी, अनंत मी"
*भाग बारावा *
ब्रिटिश साम्राज्ज्याविरुद्ध अनेक वर्षे चाललेल्या लढ्याचं परिमार्जन १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळून झालं . मात्र स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्षे सावरकरांना भारतीय सरकारने उपेक्षित ठेवलं आणि सक्रिय राजकारणापासून त्यांच्या विचारधारेला बाजूला ठेवलं गेलं . अखंड भारताच्या विभाजनामुळे सावरकरांचं मन दुखावलं . सिंधूनदीपासून सिंधूसागरापर्यंत पसरलेल्या भरतखंडाचं एकत्रित राहण्याचं त्यांचं स्वप्न अपूर्ण राहिलं . पाकिस्तानातील हिंदू स्त्री-पुरुषांवर अनन्वित अत्याचार झाले. महात्मा गांधींच्या हत्येनंतर सावरकरांवर पुढील अनेक वर्षे सावरकरांनी हिंदुस्थानाच्या युवा सशक्तीकरणासाठी अखंड प्रयत्न चालूच ठेवले . ह्या स्वातंत्र्यसूर्याने , १९६६ साली प्रायोपवेशन करून आपलं जीवनकार्य थांबवायचा निर्णय घेतला . धन्योहं , धन्योहं, कर्तव्यं मेन विद्यते किंचित , धन्योहं , धन्योहं,प्राप्तव्यं सर्वम अद्य संपन्नम . त्यांची अथक राष्ट्रनिष्ठा , अचल मनोधैर्य , अजोड बुद्धिमत्ता , दूरदर्शी विचारधारा , ओघवती वक्तृत्वे , सखोल साहित्यमाला आणि सूर्यासारखे तेजस्वी व्यक्तिमत्व शतकानुशतके मनामनांना स्फुरण देत राहावी आणि त्यांच्या जीवनप्रवासातील सत्यघटना अधिकाधिक लोकांपर्यंत पोचाव्यात ह्यासाठी केलेला आमचा हा छोटासा प्रयत्न . स्वातंत्र्यवीर सावरकर अमर रहे !
*ऑडियो ऍप्स* BookGanga Audio Reader(Android and iOS)
लेखक/दिग्दर्शक: माधव खाडिलकर संगीत: आशा खाडिलकर निर्मिती: ओंकार खाडिलकर सहनिर्माते: Reverb Productions संगीत संयोजन: आदित्य ओक ध्वनी संयोजन: मंदार कमलापूरकर डिजिटल पार्टनर: स्मृतिगंध सौजन्य: उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट