Summary of the Book
भारतीय तत्वज्ञानात जन्म, मृत्यू, आत्मा, पुनर्जन्म या गोष्टींना महत्व आहे. माणसाचा मृत्यू झाला तरी फक्त शरीर विनाश पावते, आत्मा अमर असतो. हा आत्मा म्हणजे काय? तो जाणून कसा घ्यायचा? याचा विचार करीत मानवाच्या अस्तित्वातील कंगोरे, त्याभोवती फिरणाऱ्या दृश्य, अदृश्य गोष्टी, जन्म-मृत्यू, जाणीव, सूक्ष्मदेहाचे भ्रमण, मृत्यूपश्चात आयुष्य व त्याचे पुरावे, मृत्युच्या वेळी काय घडते, मृत्यूनंतर काय घडते, काकस्पर्श व उत्तरक्रिया, पुनर्जन्म अशा अनेक गूढ गोष्टींवरील विचार डॉ. मेधा खासगीवाले यांनी आत्म्याचा प्रवास आणि मृत्यूपश्चात जीवन यातून मांडले आहेत. तत्त्वज्ञान, विज्ञान, भारतीय व पाश्चात्य देशातील या विषयावरील संशोधन याचा अभ्यास या विचारामागे असल्याने एका नव्या विषयाची ओळख सोप्या भाषेत यातून मिळते.