Reverb Katta प्रस्तुत, स्वा. सावरकर समग्र जीवनदर्शन घडविणारे एक रोमहर्षक ध्वनिनाट्य
"अनादि मी, अनंत मी"
भाग तिसरा सन 1901 : मॅट्रिक परीक्षेनंतर, यमुनामाईंशी विवाह झाल्यानंतर विनायकराव सावरकर फर्ग्युसन कॉलेजमध्ये पुण्याला पुढील शिक्षणासाठी स्थलांतरित झाले. आपले मानसगुरु आणि दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांनी इथेच सुप्रसिद्ध आरती रचली. पुण्याबाजूच्या शिवकालीन ऐतिहासिक किल्ल्यांना भेटी देता देता त्यांनी नरवीर तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे इत्यादींच्या कर्तृत्वाचे गुणगान करणारे अनेक पोवाडे रचले. लोकमान्य टिळकांच्या ब्रिटिश सरकारविरोधी लिहिलेल्या 'दैनिक केसरी'मधील जळजळीत लेखांचा विनायकरावांच्या मनावर प्रभाव पडला. स्वदेशी कपड्यांचा पुरस्कार आणि परदेशी कपड्याच्या वापरावर ब्रिटिश सरकारविरुद्ध उठाव करण्यासाठी, विनायकराव सावरकरांनी तरुणांसोबत, पुण्यात , परदेशी कपड्यांची एक जाहीर होळी आयोजित केली आणि ब्रिटिश सरकारला आव्हान दिले. ह्या कृत्याबद्दल त्यांना फर्ग्युसन कॉलेजच्या वसतिगृहातून दंड करून काढून टाकण्यात आले मात्र लोकमान्य टिळकांच्या केसरीतील टीकात्मक लेखनानंतर, प्रा. रँग्लर परांजपे ह्यांनी सावरकरांना पुन्हा भरती करून घेतलं.
Now Streaming on:
ऑडियो ऍप्स BookGanga Audio Reader(Android and iOS)
लेखक/दिग्दर्शक: माधव खाडिलकर संगीत: आशा खाडिलकर निर्मिती: ओंकार खाडिलकर सहनिर्माते: Reverb Productions संगीत संयोजन: आदित्य ओक ध्वनी संयोजन: मंदार कमलापूरकर डिजिटल पार्टनर: स्मृतिगंध सौजन्य: उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट