Summary of the Book
Episode 11
------------
Reverb Katta प्रस्तुत,
स्वा. सावरकर समग्र जीवनदर्शन घडविणारे एक रोमहर्षक ध्वनिनाट्य
"अनादि मी, अनंत मी"
*भाग अकरावा*
रत्नागिरीमध्ये शेठ भागोजी कीर ह्यांच्या आर्थिक साहाय्याने , सावरकरांनी "पतित पावन मंदिराची" स्थापना केली . प्रचलित रंग-वेष-वर्णभेद बाजूला सारून सर्व जातिभेदांना तिलांजली द्यावी, महिलांना समाजात उच्चस्थान मिळावं , सर्व समाजातील लोकांना एकत्र आणण्यासाठी सहभोजनं व्हावीत, उपेक्षित समाजाला समान हक्क मिळावेत, दलित आणि दलितेतर ह्यांच्यातील भेदभावाच्या भिंती पडून एका झेंड्याखाली एकत्र आणावं , सर्व स्तरातील लोकांना धर्मस्थळे, शिक्षण आणि सामाजिक संस्थांमध्ये समान अधिकार मिळावेत ह्यासारख्या विविध प्रबोधनात्मक विचारांनी प्रेरित होऊन रत्नागिरीला "पतित पावन मंदिर" सर्व समाजाचे केंद्रस्थान ठरले . ह्याबरोबरीनेच मातृभाषेचा आदर करून तिचा प्रसार आणि वापर अधिकाधिक ठिकाणी केला जावा, ह्यासाठी शेकडो प्रचलित इंग्रजी शब्दांना , मराठी प्रतिशब्द बनवून ते सर्वसामान्य कामकाजात आणि बोलीभाषेत वापरले जावेत ह्या "भाषाशुद्धी" च्या कार्यासाठी सावरकरांनी अथक प्रयत्न केले. आजच्या काळात सहज वापरले जाणारे "दूरध्वनी", "विधीमंडळ", "क्रमांक", "दिनांक", "प्राचार्य", "नगरपालिका" , "न्यायालय" इत्यादी अनेक मराठी शब्द सावरकरांनी मराठी भाषेत सुजवून ती समृद्ध केली . १० मे १९३७ रोजी सावरकरांवरील सर्व सरकारी आणि राजकीय बंधने बाजूला केली गेली आणि दोन काळ्या पाण्याच्या शिक्षेतून ब्रिटिशांकडून त्यांची संपूर्ण मुक्तता झाली . काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत दौरे काढून "हिंदुत्व" ह्या केवळ धर्माशी संलग्न कल्पनेच्या पलिकडचा खरा अर्थ मांडण्याच्या उद्देशाने , सावरकरांनी पूर्ण भारत पिंजून काढला . १९४४ सालच्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना सावरकरांनी भारताच्या स्वातंत्र्याचे भाकीत करताना , तरुणांना आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्वबळ भारतासाठी , साहित्य आणि विज्ञानाबरोबरीनेच शस्त्रशक्तीचे शिक्षण घेण्याचा संदेश दिला.
*ऑडियो ऍप्स*
BookGanga Audio Reader(Android and iOS)
लेखक/दिग्दर्शक: माधव खाडिलकर
संगीत: आशा खाडिलकर
निर्मिती: ओंकार खाडिलकर
सहनिर्माते: Reverb Productions
संगीत संयोजन: आदित्य ओक
ध्वनी संयोजन: मंदार कमलापूरकर
डिजिटल पार्टनर: स्मृतिगंध
सौजन्य: उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट