AUDIO BOOKS
AUDIO BOOKS
AUTHORS
ARTISTS
PUBLICATIONS
 
Search

आयुर्वेदाच्या स्मृतीतून भाग १
आयुर्वेदाच्या स्मृतीतून भाग १
Audio Book Publisher: बुकगंगा प्रकाशन

Audio Book Price: R 100 / $ 1.43
Buy Audio Book
Add to Cart

 

 
Tracks
 आयुर्वेदाच्या स्मृतीतून भाग १
 अर्पणपत्रिका
 मनोगत
 स्वागत आरोग्यदायी जीवनाचे
 आणि दाढदुखी थांबली
 अकाली पांढरे आणि गळणारे केस
 गावाती चहा तुळस व आल
 लहान मुलांचा चष्मा
 पोट दुखी (उदरशूळ )
 उचकी
 पोट साफ होत नाही ?
 बहुगुणी ' नातुराल क्रिस्टल '
 कोंडा
 पित्त
 तृष्णा
 दही
 पायांच्या भेगा
 पाळीत विश्रांती घ्याच
 डोके दुखी
 ढेकर
 दातांचे आरोग्य
 मधुमेह
 बहुगुणी हळद
 थायरोईड
 मीठ
 वात आणणारा वात
 हृद्रोग आणि क्लीज्मा
 अक्शय्यवट
 शीतपित्त
Summary of the Book
साधारण ऑक्टोबर २०१५ मध्ये लोकसत्ताच्या कार्यालयातून लोकसत्ता चतुरंग पुरवणीच्या संपादिका सौ. आरती कदम यांचा फोन आला व आपण २०१६ च्या चतुरंग पुरवणीसाठी घरोघरी आयुर्वेद किंवा आज्जीबाईच्या बटव्यातील आयुर्वेद सामान्य वाचकांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवण्यासाठी एक सदर सुरु करण्याचा आमचा मानस आहे. तरी तुम्ही या पुरवणीसाठी लिखाण कराल का? असे विचारून मला माझी लेखनशैली समजण्यासाठी २-३ लेख पाठवायला सांगितले गेले.

मी आतापर्यंत वेगवेगळ्या मासिकांमध्ये, काही वेळा वृत्तपत्रांमध्ये सुद्धा लिखाण करत असे. मात्र अशा पद्धतीने सलग एखाद्या नावाजलेल्या वृत्तपत्रासाठी लिखाण करण्याची संधी पहिल्यांदाच आली. त्यामुळे त्यांना मी २-३ लेख पाठवले व विसरूनही गेलो. काही दिवसांनंतर मला पुन्हा फोन आला व ‘आयुर्वेदाच्या स्मृतीतून‘ या सदराखाली तुम्हाला आज्जीबाईच्या बटव्यातील आयुर्वेद लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे असे सांगण्यात आले.

प्रथम माझा या घटनेवरती विश्वासच बसत नव्हता. कारण आजकाल जाहिरातीच्या युगात अशा प्रकारे एखादे नावाजलेले वृत्तपत्र एखाद्या लेखकाला एवढी मोठी संधी देत असेल असे मला वाटत नव्हते.जानेवारी २०१६ च्या पहिल्या शनिवारपासून लोकसत्ता चतुरंग पुरवणीत ‘आयुर्वेदाच्या स्मृतीतून’ या सदराखाली माझा ‘स्वागत आरोग्यदायी जीवनाचे’ या नावाचा पहिला लेख प्रसिद्ध झाला व खरोखरच या सदराचे वाचकांनी भरभरून स्वागत केले.

ही लेखमाला जसजशी पुढे जाऊ लागली तस तसे बऱ्याच वाचकांच्या प्रतिक्रिया इ-मेल तथा फोन द्वारा येऊ लागल्या. बरेच वाचक या लेख मालेचे पुस्तक आहे का किंवा आम्हाला पाठीमागचे लेख कुठे वाचायला मिळतील अशी विचारपूस करू लागले. वाचकांचा उदंड प्रतिसाद मिळाल्यामुळे आम्ही लेखमालेचं संकलन करून ‘आयुर्वेदाच्या स्मृतीतून’ भाग-१ व भाग-२ अशी पुस्तिका बनविण्याचे ठरविले व १९ जुलै २०१६ ला आमच्या ‘केशायुर्वेद’ पुस्तकाच्या प्रकाशनासोबतच प्रथम भागाचे प्रकाशन करण्याचेही ठरविले.

सदर कार्यास प्रसिद्ध वृत्तपत्र लोकसत्ताचे संपादक श्री. गिरीष कुबेर व लोकसत्ता चतुरंग पुरवणीच्या संपादिका सौ. आरती कदम यांनी प्रोत्साहन दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार. कारण त्यांच्या मोलाच्या साथीशिवाय व परवानगीशिवाय हे कार्यच होऊ शकले नसते. या सर्व कार्याचे करते करविते धनी सद्गुरू श्री माधवनाथ महाराज व सद्गुरू श्री आनंदनाथ महाराज असून मी या सेवाकार्याचा वाहक आहे. ही सद्गुरु कृपा अशीच अखंड राहो हीच धन्वंतरी चरणी प्रार्थना.

-वैद्य हरिश पाटणकर
आयुर्वेदाचार्य व नाडी तज्ञ
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 
Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Use MyVishwa.com
username or email to login.
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender

Your Email Address
Choose Password

Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.