Summary of the Book
कर्दळीवन या स्थानाला दत्त संप्रदायात महत्वाचे स्थान आहे. कर्दळीवन हे दत्तगुरुंचे गुप्त स्थान आणी श्रीस्वामी समर्थांचे प्रकटस्थान आहे. अन्य अनेक पौराणिक, धार्मिक, आध्यात्मिक, ऐतिहासिक संदर्भ या स्थानाला आहेत. या ठिकाणाला भेट दिल्यावर एक वेगळी, दिव्य अनुभूती होते, असे दत्तभक्त सांगतात. दुर्गम, सोयीसुविधांचा अभाव, अनेक गैरसमज यामुळे येथे जाणाऱ्यांचे प्रमाण कमी होते.
प्रा. क्षितीज पाटुकले यांनी येथे भेट दिली. तेथील परिसर, तेथील सर्व माहिती त्यांनी घेतली. तेथील अनुभव त्यांनी 'कर्दळीवन- एक अनुभूती'मधून सांगितले आहेत. या स्थानाचे माहात्म्य, जैव विविधता, यात्रेचा इतिहास, ती कशी करावी, अतिथी सेवा, अन्नदान या विषयी सर्व माहिती यात आहे. आधुनिक व वैज्ञानिक दृष्टिकोनातून लिहिलेले हे पुस्तक दत्तभक्तांबरोबरच अन्य वाचकांची जिज्ञासा पूर्ण करते.