Reverb Katta प्रस्तुत, स्वा. सावरकर समग्र जीवनदर्शन घडविणारे एक रोमहर्षक ध्वनिनाट्य
"अनादि मी, अनंत मी"
*भाग नववा *
रत्नागिरीच्या नजरकैदेत असताना स्वा. सावरकरांनी , नाट्यलेखनाच्या माध्यमातून विचारप्रवर्तन आणि प्रबोधन करण्यासाठी विशेष प्रयत्न घेतले . जे कार्य अनेक भाषणे देऊन होत नाही, ते कार्य एक नाटक प्रभावीरित्या करू शकतं असा त्यांचा ठाम विश्वास होता . 'संगीत उ:शाप' ह्या नाटकाद्वारे , स्पृश्यास्पृश्यता आणि जातभेदाचं उच्चाटन करण्यासाठी सर्व समाजातील लोकांच्या अंधश्रद्धा आणि पिढीजात भ्रामक समजुती दूर करून सर्वांना एका कार्यासाठी एकत्र आणणे हा, सावरकरांच्या रत्नागिरीतील कार्याचाच पुढचा अध्याय होता . बुद्धीवादी दूरदर्शीपणाचे दर्शन घडविणारे पुढचे पाऊल म्हणजे सावरकरांचे "संगीत सन्यस्त खड्ग" हे नाटक . एखाद्या राष्ट्राच्या सीमा संरक्षणासाठी आणि जगात प्रबळता टिकवून ठेवण्यासाठी अत्याधुनिक आणि अद्ययावत विज्ञाननिष्ठा आणि शस्त्रसज्जता आवश्यकता असून , आत्यंतिक अहिंसा राष्ट्राला त्याच्या शेजाऱ्यांपासून धोक्यात आणू शकते हे पटवून देण्यासाठी भगवान बुद्ध आणि त्यांचे सेनापती विक्रमसिंघ ह्यांच्यातील विचारसंघर्षावर बेतलेले हे नाटक क्रांतिकारीच ठरले . सावरकरांच्या विज्ञानवादी आणि आधुनिक विचारांना आत्मसात करण्याच्या दृष्टीकोनाचे दर्शन "संगीत संन्यस्त सन्यस्त खड्ग" नाटकातून घडते . शतजन्म शोधिताना , शतआर्ती व्यर्थ झाल्या | शतसूर्य मालिकांच्या दीपावली विझाल्या ह्यासारख्या भावोत्कट गीतांच्या उत्तमोत्तम रचना ह्या नाटकाच्या केंद्रबिंदू ठरल्या .
Now Streaming on: *ऑडियो ऍप्स* BookGanga Audio Reader(Android and iOS)
लेखक/दिग्दर्शक: माधव खाडिलकर संगीत: आशा खाडिलकर निर्मिती: ओंकार खाडिलकर सहनिर्माते: Reverb Productions संगीत संयोजन: आदित्य ओक ध्वनी संयोजन: मंदार कमलापूरकर डिजिटल पार्टनर: स्मृतिगंध सौजन्य: उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट