Summary of the Book
वर्गात 'सहकार्यात्मक अध्ययन' वापरून शिकवणे म्हणजे वर्गातील बुजऱ्या, हुशार, चळवळ्या, मागे पडणाऱ्या, या व इतर प्रत्येक प्रकारच्या विद्यार्थ्याला शिकण्याच्या प्रक्रियेत खात्रीने गोवून घेण्याचा मार्ग !! या पुस्तकात प्राथमिक पासून उच्च शिक्षणापर्यंतची विविध विषयांमधील प्रत्यक्ष उदाहरणे देऊन हा विषय सरळ सोप्या भाषेत मांडला आहे. विद्यार्थ्यांचे लहान गट करून आनंदाने शिकणे कसे घडवून आणायचे, याच्याशी निगडित सर्व दैनंदिन, व्यावहारिक तसेच सैद्धांतिक बाबी सोप्या भाषेत आपल्याला या पुस्तकात ऐकायला मिळतात. वाचकाला हवे ते प्रकरण शीर्षक निवडून वाचता येते. शिक्षक, शिक्षण महाविद्यालयांमधील प्राध्यापक, संशोधक तसेच शिक्षणाबद्दल आस्था बाळगणाऱ्या सर्वांसाठी हे पुस्तक आहे.
लेखिकेशी संपर्क : lalitaagashe@gmail.com