सीमेवर लढणाऱ्या सैनिकाच्या पत्नीचे आयुष्य एखाद्या सैनिकाप्रमाणेच चित्तथरारक असते, पत्नीही आपल्या परीने एक सैनिकच असते, हे रोहिणी मेहेंदळे यांच्या या पुस्तकातून समजते. यांचे पती प्रदीप यांच्याबरोबर त्यांनी अनेक ठिकाणी वास्तव्य केले. या काळात त्यांना अनेक अनुभव आले. त्या अनुभवांवर आधारित हे लेखन आहे.
भारतभर फिरताना त्याचा वेगवेगळ्या भाषा आणि संस्कृतीशी परिचय झाला. गुरखा रेजिमेंट, फिल्डमार्शल माणेकशॉ यांची भेट, रिचर्ड अॅटेनबरोयांची आठवण, या काळात झालेल्या मैत्रिणी, आसाम बटालियन आदींविषयी त्यांनी लिहिले आहे. एका मतीमंद मुलाची आई म्हणून आलेले अनुभवही त्या सांगतात. कर्नल प्रदीप यांच्या निवृत्तीनंतर युद्धभूमीवरून परतल्यानंतर सामान्य जीवनातील अनुभवही वाचायला मिळतात.