सव्वा-शतकाहूनही अधिक काळ भारतीय उपखंड ब्रिटिश राजवटीच्या अधिपत्याखाली होरपळून निघाला होता. इसवीसन 1857 च्या स्वातंत्र्ययुद्धापासून स्फूर्ती घेऊन, ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारणाऱ्या अनेक आद्य क्रांतीकारकांना हौतात्म्य पत्करावं लागलं. पण 1883 साली नाशिकजवळ भगूर इथं, एका युगपुरुषाचा , साक्षात श्री विनायकाचा सावरकर कुटुंबात जन्म झाला. लहानपणीच प्लेग आणि महामारीच्या आजारांमुळे आईवडिलांच्या मायेला मुकाव्या लागलेल्या सावरकर बंधू आणि येसूवहिनी ह्यांनी नाशकास प्रयाण केलं आणि विनायकाचं व्यक्तिमत्व बहरू लागलं. 'माझी मातृभूमी' ह्या विषयावर , शालेय वयात लिहिलेल्या निबंधातून त्याच्या मनातील देशप्रेमाच्या पाऊलखुणा सर्वांच्या दृष्टीक्षेपात आल्या. लेखक/दिग्दर्शक: माधव खाडिलकर संगीत: आशा खाडिलकर निर्मिती: ओंकार खाडिलकर सहनिर्माते: रिव्हर्ब प्रोडक्शन्स संगीत संयोजन: आदित्य ओक ध्वनी संयोजन: मंदार कमलापूरकर डिजिटल पार्टनर: स्मृतिगंध सौजन्य: उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट