“एकलकोंड्याच्या कबिला” या नीतीन मोरे यांच्या पहिल्या काव्यसंग्रहाला लाभलेली प्रशंसा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा २०१५ सालातील सर्वोत्कृष्ट नवोदित कवी/काव्यसंग्रहासाठीचा सुहासिनी इर्लेकर पुरस्कार “नीतीनची बैठक अध्यात्माची आहे. त्यामुळे कविता मनात रुतून बसते.” - डॉ. विजय वाड “एकाहून एक सरस कल्पना, शब्द्लाघव, विचारसौंदर्य मोहवणारं. मराठी साहित्यात हा कवी भविष्यात आपली अक्षरं कोरून जाईल, असा विश्वास वाटतो” - गिरीजा कीर “तुमचं शब्दप्रभुत्व अद्भूत आहे.” - शिरीष पै “आपली कविता म्हणजे स्वतःचा चेहरा असणारी पारदर्शी प्रतिभेची देणगी आहे. नवनव्या प्रतिमा – प्रतीकांची लेणी वाटावी इतपत वेगळेपणानं उठून दिसणारी आहे.” - डॉ. मधुकर वाकोडे