Episode 10 ------------- Reverb Katta प्रस्तुत, स्वा. सावरकर समग्र जीवनदर्शन घडविणारे एक रोमहर्षक ध्वनिनाट्य
"अनादि मी, अनंत मी"
*भाग दहावा *
सावरकरांच्या मराठी भाषेतील नाटकांच्या लेखनमालिकेतील एक स्फुरण चढविणारे पुष्प म्हणजे "संगीत उत्तरक्रिया". एखाद्या व्यक्तीवर किंवा समाजावर एखाद्याने क्रूरपणे केलेल्या अन्यायाचा सूड "जशास तसे" ह्या तत्वाने घेतला पाहिजे हा प्रमुख संदेश ,ह्या नाटकातून प्रकर्षाने पुढे येतो . पानिपतच्या युद्धामध्ये झालेल्या मराठांच्या पराभवात ,मोघलांच्या निर्दयी कारवाया आणि अत्याचारामुळे आपले संपूर्ण कुटुंब गमावलेल्या एक वृद्ध स्त्रीच्या विचारांमार्फत तिच्या मनातील सूडाची आग श्रीमंत माधवराव पेशवे ह्यांच्या मनात ती पोचवते . "उत्तरेला जाऊन पानिपत परत जिंकून घेण्याचे आव्हान हाती घेतलेस , तरच पानिपतात गमाविलेल्या हजारो सैनिकांच्या मृत्यूचे आणि त्यांच्या कुटुंबियांच्या मनातील सूडाचे उट्टे निघेल आणि तरच त्यांच्या आत्म्यांना शांती लाभेल , तीच खरी उत्तरक्रिया ठरेल " असा ज्वलंत विचार मांडणाऱ्या ह्या नाटकातील अंगावर शहारे आणणारा एक नाट्यपूर्ण प्रसंग, सावरकरांच्या विचारांचे दर्शन घडवतो . Now Streaming on: *ऑडियो ऍप्स* BookGanga Audio Reader(Android and iOS)
लेखक/दिग्दर्शक: माधव खाडिलकर संगीत: आशा खाडिलकर निर्मिती: ओंकार खाडिलकर सहनिर्माते: Reverb Productions संगीत संयोजन: आदित्य ओक ध्वनी संयोजन: मंदार कमलापूरकर डिजिटल पार्टनर: स्मृतिगंध सौजन्य: उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट