माझं पुस्तक, एखादं सुंदर गाणं आणि तुमची कॉफी हे एक असं विलक्षण जग निर्माण करण्याची माझी इच्छा आहे. हे पुस्तक जसं माझ्या मनात रेंगाळालं तसं ते तुमच्याही मनात रेंगाळावं,' अशी भावना या कथासंग्रहातील कथांमध्ये आहेत. दीप्ती मडी यांच्या चार कथांचा हा संग्रह आहे.
पहिल्या नांदी या कथेत प्रगल्भ वसुधा समोर येते. एका समारंभाभोवती गुंफलेली ही कथा नात्यांची घट्ट वीणही दाखवते. 'विराणी' या कथेत चित्राणीचे स्वयंसिद्ध होणे दिसते. 'मैफल' ही कथाही नायिकाप्रधान आहे. या कथेतील मंजूचा स्वतंत्र निर्णय अनपेक्षित असला, तरी सर्वांनाच अभिमान वाटेल असा आहे. 'भैरवी' या कथेत कॅन्सरग्रस्त मंदारला जपणारी त्याची माणसे भेटतात.
For a person like me who prefers to listen rather than read this book comes across as a refreshing series of stories which any one can relate to. A very contemporary take on Marathi Life! Definitely worth a listen.