एखाद्या निवांत सकाळी मित्र मैत्रिणींसमवेत कॉफीशॉपमध्ये बसून गरमागरम कॉफीचा आस्वाद घेत गप्पा माराव्यात आणी तिथें मिळालेली उर्जा घेऊन आपापल्या घरी जावे. ही उर्जा आठवडाभर आपल्याला उपयोगी पडते. हा अनुभव श्रीपाद ब्रम्हे यांच्या या पुस्तकातून मिळतो.
आपले नेहमीचेच अनुभव वेगळ्या दृष्टीने पाहण्याची दृष्टी या छोटेखानी लेखांमधून मिळते. राजकारण, समाजकारण, साहित्य, कला, संगीत, सिनेमा, खेळ आदी विविध विषय या लेखांमधून खुसखुशीत शैलीत हाताळले आहेत. लेखांची शिर्षकेही बहारदार आहेत. हुकी हुकी सी जिंदगी, बिहाराष्ट्र?, दिवाने आम, वाईच राशिक...' अशी वानगीदाखल उदाहरणे देता येतील. आयुष्य हे एक सेलिब्रेशन आहे, असं मानणाऱ्या सर्वांसाठीचं केलेले हे लेखन.