बेफान वा-यासारखे आयुष्य सारखे वहात असते .नजरकैदेत जगताना माणूस एक सामाजिक प्राणी असल्यामुळे सभोवतालच्या परिस्थितीचा त्याच्यावर प्रभाव पडतो.कधी वीण टाकून त्याचे संवेदनशील मन मुक्या भावनांच्या शब्दांनी सृजन करते .निसर्ग व जीवनानुभव वास्तव आहे . अनुभव जीन्नसावर माझे अलौकिक प्रेम आहे . कारण त्यात प्रकाशाची वाट आहे .निसर्गाच्या चैतन्यात स्त्री चे स्वप्न कधी तेजाने झळाळून गेले तर कधी एकतीतून मुक्त होण्यासाठी माळरानावर उशाशी दगड घेऊन निजावे वाटले .डोळ्यातील बाहुली आपल्या हाताने कुस्करून कधीतरी या चंचलेचा मनझुलवा प्रणयधुंद होऊन क्षणभरात वास्तवतेला लटकून चिंध्या होतो .वेळूच्या बनात काल , आज नी उद्या विस्तवातअसलेली ही स्त्री . तिच्या मुक्या भावनाचे हे मोकळे श्वास ....तर कधी वास्तवातली शुद्ध स्पंदन... विस्तवाचे वास्तव मांडण्यासाठी प्रमोद चुंचूवार ,गजाननजांभोर ,लोकमत ,नागपूर यांच्या आग्रहाने सहकार्य दिले .महारास्त्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने अनुदान दिल्यामुळे मी मंडळाची शतशः ऋणी आहे . वाचकांना शक्ती मानून त्यांच्या हातात विस्तवाचे वास्तव देताना ऊर भरून येत आहे . ......सुमीता कवडूजी कोनबत्तूनवार