Episode 7 Reverb Katta प्रस्तुत, स्वा. सावरकर समग्र जीवनदर्शन घडविणारे एक रोमहर्षक ध्वनिनाट्य
"अनादि मी, अनंत मी"
*भाग सातवा* अंदमानात 50 वर्षे कैदी म्हणून जाण्याचा प्रसंग उभा ठाकला असतानाही, स्थितप्रज्ञ राहून मनाला उभारी देत, मृत्यूशी झुंजण्याचा निश्चय करणाऱ्या सावरकरांनी 'अनादि मी अनंत मी, अवध्य मी भला' अशी गर्जना करत स्वतःच्या मनाला उभारी दिली . बोटीवरून अंदमानात नेताना ब्रिटिशांच्या निर्दयी हालअपेष्टा सोसत , युगपुरूष सावरकरांनी 4 जुलै 1911 रोजी अंदमानाच्या कारागृहात प्रवेश केला . पहिल्याच भेटीत , सेल्युलर जेलच्या कर्दनकाळ जेलर बॅरीच्या धमक्यांना न जुमानता, आपल्या निश्चल मनोवृत्तीचा आणि ध्येयाचा धडा त्याला दिला. सावरकरांना राजबंदी (Political Prisoner) म्हणून पाठविले गेले असतानाही 'Dangerous' असा बिल्ला त्यांच्या गळ्यात अडकवला गेला आणि, त्यांची रवानगी सात नंबरच्या बराकीच्या वरच्या मजल्यावरील एका काळकोठडीत झाली. Now Streaming on: *ऑडियो ऍप्स* BookGanga Audio-Reader(Android and iOS)
लेखक/दिग्दर्शक: माधव खाडिलकर संगीत: आशा खाडिलकर निर्मिती: ओंकार खाडिलकर सहनिर्माते: Reverb Productions संगीत संयोजन: आदित्य ओक ध्वनी संयोजन: मंदार कमलापूरकर डिजिटल पार्टनर: स्मृतिगंध सौजन्य: उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट