Episode 6 Reverb Katta प्रस्तुत, स्वा. सावरकर समग्र जीवनदर्शन घडविणारे एक रोमहर्षक ध्वनिनाट्य
"अनादि मी, अनंत मी"
भाग सहावा 8 जुलै 1910 - सावरकरांवर भारतात खटला भरण्यासाठी त्यांना मोरिया बोटीतून लंडनवरून आणत असताना, फ्रान्सच्या मार्सेल बंदराजवळ , त्यांच्या एका ऐतिहासिक उडीचा साक्षीदार अवघा आंतरराष्ट्रीय समुदाय झाला. भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचे लक्ष जागतिक स्तरावर जावे ,ह्या मुत्सद्दी हेतूने तात्यारावांनी केलेल्या ह्या चित्तथरारक कृतीचे पडसाद, इंग्रजांच्या संसदेत आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयात उमटले. मात्र मोबदल्यात ,सावरकरांना दोन काळ्या पाण्याच्या ५० वर्षांची अभूतपूर्व जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली अंदमान बेटांवर पाठविण्याचा निर्णय झाला. त्याआधी त्यांची रवानगी सर्वप्रथम मुंबईच्या डोंगरी कारागृहात झाली. तिथे त्यांची आणि सौ. यमुनामाई सावरकरांची अनेक वर्षांनी प्रत्यक्ष भेट घडली .काळ्या पाण्याच्या शिक्षेचे जोखड मानगुटीवर असताना आणि कौटुंबिक भविष्याची काहीच कल्पना नसताना , देशाच्या भवितव्याचा आणि स्वातंत्र्याचा विचार सतत मनात ठेवणाऱ्या ह्या अनोख्या सावरकर कुटुंबाला सादर प्रणाम !
Now Streaming on: ऑडियो ऍप्स BookGanga Audio Reader(Android and iOS)
लेखक/दिग्दर्शक: माधव खाडिलकर संगीत: आशा खाडिलकर निर्मिती: ओंकार खाडिलकर सहनिर्माते: Reverb Productions संगीत संयोजन: आदित्य ओक ध्वनी संयोजन: मंदार कमलापूरकर डिजिटल पार्टनर: स्मृतिगंध सौजन्य: उत्तुंग सांस्कृतिक परिवार ट्रस्ट