''कंगोरे मनाचे'' या पुस्तकातिल कथा सत्य घटनेभोवतीच लिहीलेल्या आहेत. आजपर्यंत माणसाच्या मनाबद्दल काही शोध लागलेला नाही. “दोष” कथेमध्ये नवर्याला एम. एन.डी. रोग झाल्यावर त्याच्या पत्नीची,घरातल्यांची होणारी मानसिकता , “परतफेड” मध्ये चांगला स्वीमर असलेला नवरा पोहोताना पाण्यात बुडून गेल्यावर आपल्या मुलाला परत पोहण्याकरिता हिम्मत देणारी आई, “अनघाची गोष्ट” मधील हल्ली शॉर्टकट मारून फास्ट वजन कमी केल्यावर आपल्या शरीरात होणारा बदल न समजणारी अनघा , ह्यात माणसांच्या मनाचे कंगोरे कधी घट्ट होतात तर कधी बोथट. आशा आहे “आठवणींचे पिंपळपान” प्रमाणेच हेही पुस्तक आपल्याला आवडेल.