कथेला संगीताची साथ देण्याची कल्पना डॉ. जी .पी कुलकर्णी कोल्हापूर यांनी प्रथम सुरु केली केली त्याचे प्रयोग कोल्हापूर शाहू स्मारक भवन येथे केले. प्रस्तुत कथा या वैशिष्ठ्यांची साथ देतात .श्रोत्यांची अभिरुची आणि मुल्यांची जाण संपन्न करणारी हि वैशिष्ठये आहेत. डॉ .पी.जी. चा आवाज नाट्यपूर्ण आणि कसदार आहे .लेखकाच्या तोंडून त्याच्या कथा ऐकताना एक वेगळीच अनुभूती आल्यावाचून राहत नाही .
माझ्या स्त्री मैत्रिणी लेखाचे नाव वाचून आपण वाचण्यासाठी आकर्षित होतो. डॉ चि भाषा सहज समोरच्या व्यक्तीशी संवाद साधणारी मनाला साद घालत हळुवार फुंकर घालत .......त्या त्या व्यक्तिला वैशिष्टय़ पूर्ण शैलीत चितारली..व्यक्ति डोळ्यासमोर उभी राहत नव्हे तर आपण त्या व्यक्तीला भेटायला उत्सुक होतो. अशी अनेक व्यक्तिमत्व त्यांनी साकारली आहेत. हे भाग्य मला लाभले .....