पहिल्यांदाच गोष्टी लिहायला लागलोय. जवळच्या टेकडी परिसरातील जंगलात फिरू लागलो.
अचानक मला एक भाषा सापडली. तिच्यामुळे मी ओळखीच्या झाडांशी बोलू लागलो. नंतर कळलं, गवत, झुडपं सगळेही त्याच भाषेत बोलताहेत. मग काय नुसत्या गप्पा आणि गप्पाच. कधीतरी पक्ष्यांनी, किड्यांनीही येऊन बोलायला सुरूवात केली. आणि घरी आल्यावर वरचा पंखाही त्याच्या घसघस भाषेत म्हणाला, `काय माझ्याशी नाही बोलायचं वाटतं’. या सगळ्यांनी माझं जीवन काठोकाठ भरून टाकलंय. त्यांच्या गप्पांमधून निघालेल्या या काही गोष्टी.