समर्थ रचित करुणाष्टके म्हणजे भगवंताकडे सांगितलेले गाऱ्हाणे ...आंतरिक तळमळ ,दु:ख,वेदना देवाकडे पोचवण्याचे आकार ,उकार मकार म्हणजेच करुणाष्टके... समर्थांनी करुणाष्टकात देवशोधनाची तळमळ प्रभावीपणे व्यक्त केली आहे ...ऐहिक देहोपभोगाच्या पलीकडे जाऊन माणसाच्या अस्तित्वाचे मूळ म्हणजे बुद्धी l समर्थांनी रामाकडे फक्त बुद्धीच मागितली ...देहाच्या पलीकडे जाऊन निखळ , निर्मळ पवित्र अशी ही स्वशोधाची प्रक्रिया म्हणजेच उपासना ...जरूर ऐका ...योग्य आघातासहित म्हणा ...आपली अनुभूती आपणच घ्या जय जय रघुवीर समर्थ l